काकळ गौळवाडीचा ग्रामपंचायत सदस्यांसह भाजप मध्ये जाहिर पक्षप्रवेश
तळाशेत जिल्हा परिषद मतदार संघात भाजपाचे जोरदार वारे.

बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड) भारतीय जनता पक्षाचे युवानेते निलेश थोरे यांच्या नेतृत्वामध्ये भाजप ने तळाशेत जिल्हा परिषद मतदारसंघा मध्ये जोरदार बांधणी केली असून दिनांक २४ ऑक्टोबर रोजी साई पंचायत समिती गणातील काकळ गौळवाडी या संपूर्ण गावाने गावकमिटीचे अध्यक्ष व साई विभागातील जेष्ठ कार्यकर्ते किसन महाडिक यांच्या नेतृत्वामध्ये भाजपा दक्षिण रायगड कार्यालय अलिबाग येथे जाहीर पक्षप्रवेश केला, विशेष म्हणजे सर्वांनी एकमुखी निर्णय घेऊन सर्वच्या सर्व ग्रामस्थांनी पूर्ण गावाचा पक्षप्रवेश केला ला.
काकळ गौळवाडीसह भारतीय जनता पक्षामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ऍड.आस्वादशेठ पाटील,जिल्हा सरचिटणीस ऍड.महेश मोहिते,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.चित्राताई पाटील,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे,माणगाव तालुकाध्यक्ष परेश सांगले,महिला तालुकाध्यक्षा सौ.रचना थोरे,तालुका उपाध्यक्ष सुधीर म्हामुणकर,संतोष कळंबे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला.
यावेळी गांव कमिटी अध्यक्ष किसन महाडिक यांच्यासमवेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री.गजानन रिकामे,मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष नामदेव बाटे,गावकमिटीचे सचिव सुनील महाडिक,खजिनदार दगडू महाडिक,मुंबईकर मंडळाचे उपाध्यक्ष मुकेश रिकामे,सेक्रेटरी अशोक जाळगावकर,उपसेक्रेटरी विलास महाडिक,खजिनदार विनायक महाडिक,उपखजिनदार संदीप महाडिक यांच्यासमवेत अनंत महाडिक,सौरभ महाडिक,निखिल महाडिक,सुरेश नटे,निखिल रिकामे,संतोष महाडिक,आकाश महाडिक,वसंत महाडिक,अमोल बाटे,अनिकेत बाटे,अशोक रिकामे,तुषार बाटे,रिद्धेश महाडिक,अनिल महाडिक,अरविंद महाडिक,हृषभ महाडिक,रामजी महाडिक,अक्षय महाडिक,हृतिक महाडिक,अल्पेश महाडिक,केतन महाडिक,निखिल महाडिक,वसंत महाडिक,दिलीप महाडिक,भारत महाडिक,अंकुश रिकामे,गणपत महाडिक,सचिन महाडिक,ओमकार महाडिक यांनी जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी ऍड.महेश मोहिते यांनी उपास्थिताना मार्गदर्शन केले,यावेळी किसन महाडिक यांनी सांगितले कि युवानेते निलेश थोरे यांच्यासारखा रात्री अपरात्री सामान्य माणसांना स्थानिक पातळीवर धावून जाणारा व प्रशासनाची जाण असणारा कार्यकर्ता आपल्या भागामध्ये त्यांच्या पत्नी सौ.रचना थोरे यांना येत्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवत असल्याने त्यांचे हात बळकट करण्यासाठी व केंद्राच्या,राज्याच्या योजना आणि विकास आमच्या गावातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्या साठी आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहोत.यावेळी निलेश थोरे यांनी काकळ गौळवाडी ही केवळ पक्षात आली नसून तर भाजपा परिवारात सामील झाली आहे त्यामुळे भविष्यात येथील ग्रामस्थांच्या मनात असणारी विकासकामे तर होतीलच परंतु केवळ विकासकामांवर न थांबता येणाऱ्या प्रत्येक अडचणी संकटात भाजपा ताकदिनीशी ग्रामस्थांच्या पाठीशी उभी असणार आहे.दरम्यान या पक्षप्रवेशामुळे या विभागात व मतदारसंघात भाजपाला आणखी ताकद मिळाली असून मतदार संघात भाजपाचे वारे जोरदार वाहत असल्याचे स्पष्ट होत आहे.या कार्यक्रमासाठी अलिबाग तालुकाध्यक्ष रोशन भगत, अशोक वारगे,चेतन पाटील यांच्या समवेत महादेव कदम,नयन पोटले,साईनाथ पेणकर,अमोल पवार,सरचिटणीस बाबुराव चव्हाण,अनिल दांडेकर यांनी विशेष मेहनत घेतली.




